कुछ अनसुनी कहानियां

Share:


                       कुछ अनसुनी कहानियां      


                                                              राजस्थानातील अजमेर येथील ख्वाजा मोईद्दीन चिस्ती यांच्या काबूत असणारी साचे व मृतात्मे याच्या शेकडो कथा प्रचलित आहेत. अहमदाबादवर स्वारी करताना अकबर बादशहा अजमेर मार्ग गेला होता. त्याला मिळालेल्या दिव्य संदेशामुळे कोणतीही लढाई न करता त्याने अहमदाबाद जिंकून घेतले. गुजरातच्या स्वारीहून परतताना वाटेत झालेल्या तीस हजार लोकांच्या बंडाळीस त्याने अवघ्या तीन हजार सैनिकांच्या सहाय्याने काबूत आणले. असे म्हटले जाते की अकबराच्या सहाय्यास आलेल्या पिशाचांनी बंडखोरांचे मानसिक स्वास्थ्यच बिघडवून टाकलेले होते. अकबर इ. स. १५७६ मध्ये पुन्हा अजमेरला गेला. त्यावेळी त्याने राजा मानसिंग याच्या आधिपत्याखाली पाच हजार सैनिकांचा ताफा देऊन राणा प्रतापवर स्वारी करण्यास पाठविले होते. पण राणा प्रतापने त्या सैन्यासाठी अजमेर पासून चितोडला येणारी अन्नधान्याची रसदच तोडून टाकली. इतकेच नव्हे तर हळदीघाट लढाईच्या पूर्वी राणा प्रताप अकबर निद्रेत असतानाच त्याचा वध करण्याची योजना तयार केलेली होती. राणा प्रताप आपल्या शूर योद्ध्यांसह अकबराच्या छावणीपर्यंत पोचलाही. पण तेथे पोचताच अत्यंत पारदर्शक अशा मानवी आकृती छावणीचे रक्षण करताना त्यास आढळल्या. राणा प्रतापने त्यांना वंदन केले व तो परतला. आपल्या सर्व शक्तीनिशी अकबराने राणा प्रतापला जिंकण्यासाठी इ. स. १५८५ पर्यंत शिकस्तीचे प्रयत्न केले. पण हे प्रयत्न चालू असतानाच अकबराने आकस्मिकपणे ही मोहीम थांबविली असे इतिहास सांगतो. यामागील कारण म्हणजे अकबराने राणा प्रतापचा नाद सोडला किंवा अचानक त्याचा उदारमतवादीपणा उफाळून आला असे मुळीच नाही. तर अजमेरच्या ख्वाजा मोईद्दीन चिस्तींनी त्याच्या स्वप्नात जाऊन राणा प्रतापच्या वाटेला न जाण्याचा इशारा दिला होता. शिवाय तसे न केल्यास पंजाब प्रांत हातातून जाईल असेही निथुन बजावले होते. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी अकबराने पुन्हा राणा प्रतापवर हल्ला चढविण्याचा इरादा मनात बाळगला. पण त्याही वेळा चिस्तीसाहेबांनी तसे न करण्याविषयी त्याचे मन वळवले होते. या सर्व हकिकतीवरून एक गोष्ट दिसून येते की ज्यावेळी पिशाचांच्या झंडी एकत्र येऊन कार्य करीत असतात तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एखादी दैवी शक्तीही कार्यरत असते. ती त्या झुंडींना दृष्कृत्यापासून परावृत्त करत असते.
                                               https://youtu.be/FztD-aBsc6A

No comments