Haunted House in indore

Share:


                      Haunted House in indore



इ.स. १९८१-८२ च्या सुमारास इंदूर शहरात प्रकाश कॉलनीत राहणाऱ्या जे. के
गुहा नामक एका बंगाली सद्गृहस्थाच्याधरी विचित्र घटना घडू लागल्या. घटनांची मालिका दि.२४ ऑक्टोबर १९८१ रोजी सुरू झाली, घराच्या भिंतीवर काही अक्षरे खरडली जाऊ लागली व पुस्तके फाडली जाऊ लागली. शिवाय अशा काही घटना घडू लागल्या की त्यांचे नुकसान श्री. गुहांना पोचू लागले. प्रथम त्यांना संशय आला तो त्यांची तीन वर्षांची नात ऋतुश्री हिचा. ऋतुश्री बरीच खोडकर मुलगी होती. गुहा कुटुंबियांनी ऋतुश्रीवर सक्त नजर ठेवली. रंगीत पेन्सिली, खडू इत्यादि लेखनसाहित्य तिच्या हातासन पोचेल अशा उंच जागी ठेवण्यात आले. इतकी सर्व खबरदारी घेऊनही घटना घडतच राहिल्या. त्या घटनांमागे इवल्याशा ऋतुश्रीचा हात नाही हे सिद्ध झाले. मग या घटनामागे नेमकी कोणती शक्ती असावी याविषयी तर्ककुतर्क सुरू झाले. एके दिवशी सहाशे पृष्ठांचे एक अख्खे पुस्तक फाटून त्याच्या चिंध्या झाल्या. विशेष म्हणजे सगळी पाने एका विशिष्ट जागीच फाटलेली होती. प्रसंगाचे गांभीर्य गुहा कुटुंबियांना समजून चुकले. या सर्व घटना घडण्यात घरच्या कोणाचाही हात नव्हता याचीही खात्री पटत चालली. घरातील कोणीही अशा गोष्टी करत नाही हे सिद्ध झाल्यावर महत्त्वाच्या वस्तू पेटीत ठेवून त्या पेटीस कुलूप घालण्यात आले.
त्याच वर्षी नोव्हेंबरच्या १५ ते २० दरम्यान अशा बंद पेटीत ठेवलेल्या वस्तूंचीही नासधूस केलेली आढळून आली एकाच पायाच्या चप्पला किंवा बूट नाहीसे होऊ लागले. मोठ्या कष्टाने अनेक दिवस खर्च करून विणलेले लोकरीचे कपडे क्षणार्धात उसवून पडू लागले.
डिसेंबर महिन्यात असेच बंद पेटीत ठेवलेले एक पुस्तक फाटून त्याचे तुकडे झाले. जानेवारी १९८२ मध्ये तर घटना शिगेस पोचल्या. खोलीत सर्वत्र मलमूत्र शिंपडले जाऊ लागले. पण विशेष म्हणजे त्यामुळे बिछाने मात्र ओले होत नसत. या सर्व घटना सकाळी सात ते अकरा आणि दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडत असत. या घटनांचा अभ्यास करण्यासाठी परदेशी संशोधकदेखील उपस्थित झालेले होते आणि एके दिवशी दि. २६ जाने १९८२ रोजी सर्व घटना आकस्मिकरित्या बंद झाल्या. त्याला कारण असे घडले की त्या घरातील ज्या नोकराणीला माध्यम बनवून हे सर्व चाळे त्या घरातील पिशाच्चाकडून केले जात ती नोकराणी २४ जानेवारी रोजी आपल्या गावी गेली आणि २५ जानेवारी रोजी सर्व खेळ थांबला. येथे प्रश्न असा उद्भवतो की त्या नोकराणीच्या माध्यमाकरवी या सर्व घटना घडत असतील तर तिचा सहभाग का दिसून येऊ नये? कारण इतरांप्रमाणेच तिच्यावरही सक्त नजर होतीच. त्याचे उत्तर असे की, माध्यमाकरवी घडविल्या जाणाऱ्या घटनामध्ये माध्यमाच्या शरीराचा सहभाग दिसून येईलच असे नाही. कारण कुलूप लावून बद कलेल्या पेटीतील पुस्तकाची पाने माध्यमाच्या हाताने फाडली जाणे शक्य नाही. तर माध्यमाच्या प्राणशक्तीचा येथे उपयोग केला जातो. माध्यमाच्या प्राणशक्तीला इंग्रजीत सायकिक एनजी (Psychic energy) असे म्हणतात. वृत्तपत्रातून प्रसत होणाऱ्या भुताटकीच्या वातांमध्ये अशीच कोणा तरी माध्यमाची प्राणशक्ती घेऊन पॉल्टरजिस्टमार्फत कारवाया चालू असतात. स्वतः माध्यमाला याची कोणतीही जाणीव नसते.


                                        https://youtu.be/FztD-aBsc6A

No comments