अनासूनि सच्ची घटनाये

Share:

                               अनासूनि सच्ची घटनाये 


   
   ज्यावेळी माध्यमाची प्राणशक्ती पिसांचा कडून  वापरली जाते तेव्हा त्या प्राणशक्तीची तीव्रता इतकी असू शकते की विजेवाचून उपकरणे कार्यरत हाऊ शकतात
असा एक घटना अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात इ.स. १९८१ मध्ये घडली. पॅट्रिक केली हा अत्यंत श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्यातनाम होता. त्याला बुद्धिबळाच्या खेळाचा छद होता.मोरीस टिलेट हा त्याचा बुद्धिबळातील सहखेळाडू  होता. इ.स. १९५५ मध्ये मॉरीसचे आकस्मिक निधन झाले. त्याच्या निधनानंतर पॅटिक केलीने आपले लक्ष व्यवसायात केंद्रित केले. इ. स. १९७९ मध्ये कॉम्प्युटरच्या एका प्रदर्शनात त्याने एक कॉम्प्युटर सेट खरेदी केला. आपल्या गतमित्राची आठवण म्हणून त्याने मॉरीसचा एक प्लॅस्टरचा पुतळाही कॉम्प्युटरशेजारी बसवला. पॅट्रिकने आपणांस माहीत असलेल्या बुद्धिबळाच्या सर्व खेळी त्या कॉम्प्युटरमध्ये भरून घेतल्या. नंतर त्याने कॉम्प्युटरवर बुद्धिबळाचा डाव मांडला. डाव ऐन रंगात आला व अचानक कॉम्प्युटरमध्ये फ्रान्सच्या एका बुद्धिबळपटू अठराव्या शतकात शोधून काढलेली एक खेळी मांडली गेली. हीच खेळी पॅट्रिकचा गतमित्र मॉरीस यालाही फार आवडत असे. पॅट्रिक दोनतीन तास कॉम्प्युटरवर खेळत राहिला. अचानक त्याच्या लक्षात आले की कॉम्प्युटरची पिन इलेक्ट्रिक प्लगशी जोडलेली नव्हती. इतकेच नव्हे तर एखादी महत्त्वपूर्ण खेळी सुरू होताच मॉरीसचा प्लॅस्टरचा पुतळा पुढे सरसावून कॉम्प्युटरवर खेळतो आहे असा पॅट्रिकला भास होई. पॅट्रिकचे कॉम्प्युटरच्या यंत्रणेविषयीचे ज्ञान यथातथाच होते. विद्युत्प्रवाह नसतानाच कॉम्प्युटर चालू लागला तेव्हा त्याला वाटून गेले की कॉम्प्युटरमध्ये संचित विद्युत्प्रवाहाची काहीतरी खास सोय असली पाहिजे. पॅट्रिकचे घर मेसँशूट प्रांतात ब्रेन्ट्री परिसरात होते. त्याच्या घरापासून कॉम्प्युटरची कंपनी बरीच दूर होती. त्याने कंपनीशी संपर्क साधला. फक्त प्रोग्रॅम केलेल्याच खेळी कॉम्प्युटरकडून खेळल्या जात असताना त्याने अठराव्या शतकातील खेळी कशी खेळली असा प्रश्न त्याने कंपनीच्या इंजिनिअरना केला. त्यांनाही काही उत्तर सुचले नाही. त्यांनी पहिला कॉम्प्युटरसेट बदलून नवा दिला. त्यात त्यांनी प्राथमिक स्वरूपाच्या बावीस व प्रगतावस्थेतील सुमारे साठ खेळींचा प्रोग्रॅम भरून दिला. पॅट्रिकने त्या दिवशी वृत्तपत्रात वाचलेली खेळी कॉम्प्युटरवर खेळण्यास सुरुवात केली. अचानक कॉम्प्युटरने आपला पवित्रा बदलला. पॅट्रिकने कंटाळून कॉम्प्युटर बंद करण्याच्या इराद्याने बटन दाबले. पण कॉम्प्युटर बद होण्यास राजी नव्हतापैट्रिकने प्लग ओढला. तरीही कॉम्प्युटरची शेवटची खेळी तशीच होती. दुसरे दिवशी पॅट्रिकने मॉरीसबरोबर खेळलेली खेळी घेतली. एप्रील १९५२ मध्ये दोघांनी केलेल्या सर्व खेळया जशाच्या तशा कॉम्प्युटरवर येत गेल्या. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा कॉम्प्युटर कंपनीच्या इंजिनिअ ना तेथेच बोलावून घेतला. सर्वांनी प्रयत्नांची शिकस्त केली.मॉरीसच्या प्लॅस्टरच्या पुतळ्यास चुकून एखादे उपकरण बसवले असावे या संशयाने त्यांनी संपूर्ण पुतळ्याची तपासणी केली. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. इंजिनिअर मंडळी निघून गेली. पुढे पुढे पॅट्रिक कॉम्प्युटरवर बसला नसतानाही कॉम्प्युटर आपोआप सुरू होई, तर काही वेळा प्रयत्न करूनही तो सुरू होत नसे. नंतर ही घटना परलोकविद्याविशारदांकडे सोपविण्यात आली. त्यांनी सर्व चाचण्या घेतल्या. त्यांनी निष्कर्ष काढला की मॉरीसचे पिशाच पॅट्रिकला माध्यम करून त्याच्या अंगातील प्राणशक्तीचा उपयोग करून हे सर्व चाळे करत होते... ..


                            https://youtu.be/FztD-aBsc6A

No comments